सार्वजनिक सुट्टी निमित्त पर्यटनस्थळांवर गर्दी; पर्यटकांनी एकमेकांना रंग लावून लुटला होळीचा आनंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 04:19 PM2024-03-25T16:19:22+5:302024-03-25T16:19:49+5:30

जुने गाेव्यातील चर्च ही जगप्रसिद्ध  आहे. देश विदेशातील पर्यटक ही चर्च पाहण्यासाठी येत असतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची गर्दी अफाट असते. त्यामुळे आज येथे माेठ्याप्रमाणात पर्यटक दाखल झाले हाेते. तसेच राज्यातील इतर पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची माेठ्या  प्रमाणात गर्दी  होती.

Crowds at tourist spots due to public holidays; Tourists also enjoyed Holi by painting each other | सार्वजनिक सुट्टी निमित्त पर्यटनस्थळांवर गर्दी; पर्यटकांनी एकमेकांना रंग लावून लुटला होळीचा आनंद 

सार्वजनिक सुट्टी निमित्त पर्यटनस्थळांवर गर्दी; पर्यटकांनी एकमेकांना रंग लावून लुटला होळीचा आनंद 

नारायण गावस -

पणजी: शनिवार, रविवारी तसेच रंगपंचमीनिमित्त आज सोमवारी अशी सलग सुट्टी मिळाल्याने राज्यात पर्यटकांची संख्या वाढली. आज गावागावात रंगपंचमी साजरी केली जात असली तरी राज्यातील बहुतांश पर्यटन ठिकाणी पर्यटकांची गर्दी होती. साेमवारी जुने गाेव्यातील जगप्रसिद्ध चर्च पाहण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांनी गर्दी केली होती.

जुने गाेव्यातील चर्च ही जगप्रसिद्ध  आहे. देश विदेशातील पर्यटक ही चर्च पाहण्यासाठी येत असतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांची गर्दी अफाट असते. त्यामुळे आज येथे माेठ्याप्रमाणात पर्यटक दाखल झाले हाेते. तसेच राज्यातील इतर पर्यटन स्थळांवरही पर्यटकांची माेठ्या  प्रमाणात गर्दी  होती.

पर्यटकांनी राज्यात फक्त पर्यटन स्थळे पाहिली नाहीतर पर्यटकांनी होळीचा आस्वादही घेतला.  राज्यात हाेळी उत्सव हा आता ग्रामिण भागातच नाहीतर शहरी भागातही साजरा केला जातो. शहरात शिमगाेत्सवात रोमटामेळ तसेच एकमेकांना रंग लावून हाेळी खेळली जाते. पणजी आझाद मैदानावर स्थानिक लोकांप्रमाणे देशविदेशातील पर्यटकांनी या हाेळी सणाचा आस्वाद घेतला. बहुतांश पर्यटनस्थळी पर्यटकांनी  एकमेकांना रंग लावून हाेळीचा आनंद लुटला. यातून गाेव्याची परंपरा ही जगभर पाेहचली.

पर्यटक हे आता फक़्त शहरापुरतीच नाहीतर ग्रामीण भागातील विविध ठिकाणी जात असतात. फक़्त समुद्र किनारे कॅसिनो, चर्च, फार्महाऊस एवढ्यापुरतीच नाहीतर आता ग्रामिण भागातही पर्यटक पोहचले आहे. आज हाेळी रंगपंचमी असल्याने अनेक पर्यटक खास राज्यात हाेळी खेळण्यासाठी आले आहेत. समुद्र किनारी हाेळी निमित्त अनेक मनाेरंजनाचे कार्यक़्रम आयोजित केले आहे. यात देश विदेशातील  सिने अभिनेते, गायक, नृत्यकलाकार असे विविध कलाकार दाखल झाले आहेत.

Web Title: Crowds at tourist spots due to public holidays; Tourists also enjoyed Holi by painting each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.