Sunday, June 2, 2024
Homeताज्या घडामोडीएमएचटी सीईटी २०२३ चा निकाल १२ जूनला

एमएचटी सीईटी २०२३ चा निकाल १२ जूनला

जाणून घ्या निकालाची अधिकृत वेबसाईट

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने आज महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षा निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली. हा निकाल १२ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल. उमेदवार अधिकृत वेबसाइट – cetcell.mahacet.org वर निकाल पाहू शकतात.

एमएचटी सीईटी परीक्षा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपसाठी (पीसीएम) ९ मे ते १४ मे दरम्यान आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपसाठी (पीसीबी)१५ मे ते २० मे या कालावधीत घेण्यात आली होती. २६ मे रोजी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली होती. उमेदवारांना २८ मे पर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली होती. एमएचटी सीईटी २०२३ चा निकाल जाहीर झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष पात्र उमेदवारांसाठी ऑनलाइन एमएचटी सीईटी समुपदेशन २०२३ आयोजित करणार आहे.

गेल्या वर्षी, २०२२ मध्ये एमएचटी सीईटी निकालाच्या पीसीएम गटात १३ उमेदवारांनी १०० टक्के गुण मिळवले होते आणि पीसीबी गटात १४ उमेदवारांनी परिपूर्ण गुण मिळवले होते. एकूण ६,०५,९४४ पैकी पीसीएम गटात २,८२,०७० आणि पीसीबी गटात ३,२३,८७४ उमेदवारांनी एमएचटी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली, जी २०२१ च्या नोंदणीच्या संख्येपेक्षा ५,१७,१३२ ने जास्त होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -