Bhima Koregaon Shaurya Din | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhima Koregaon Shaurya Din | कोरेगाव भीमा जवळील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी सोमवारी (दि. 1 जानेवारी) येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे (Bhima Koregaon Shaurya Din). पुणे पोलीस दलातील तीन हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी, अधिकारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या पथकांचा (SRPF) मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Vijaystambh Sohala)

विजयस्तंभाला अभिवादन (Bhima Koregaon Shaurya Din) करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दलाकडून विजयस्तंभाच्या ठिकाणी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, मागील 15 दिवसांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची टीम कोरेगाव भिमा येथे पाहणी करत आहे. मी स्वत: त्याठिकाणी भेट दिली आहे.

असा असेल पोलीस बंदोबस्त

कोरेगाव भिमा येथील बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त (CP), सह पोलीस आयुक्त (Joint CP), 4 अपर पोलीस आयुक्त (Addl CP), पोलीस उपायुक्त (DCP) -11, सहायक पोलीस आयुक्त (ACP) -42, पोलीस निरीक्षक (PI) -86, सहायक पोलीस निरीक्षक (API) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) – 271, पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable)- 3200, 700 होमगार्ड (Home Guard), एसआरपीएफ च्या सहा कंपनी तैनात असणार आहेत. याशिवाय आणखी बंदोबस्ताची मागणी केली असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

अधिकाऱ्यांसोबत बैठका

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी, बार्टीचे अधिकारी, जिल्हा परिषदचे सीईओ, समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांच्या संपर्कात आहोत. पीडब्ल्यूडी, महावितरण यासह इतर संबंधित खात्यांसोबत आम्ही संपर्कात आहोत. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतली असल्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

10 लाखांहून अधिक अनुयायी येण्याची शक्यता

अभिवादन सोहळ्यासाठी यंदा 10 लाखाहून अधिक अनुयायी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. यंदा 20 ते 25 टक्के अनुयायी जास्त येतील, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. तसेच यावेळी कोणत्याही सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. सोहळ्या दरम्यान ड्रोन वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ पोलिसांचे 6 ड्रोन याठिकाणी असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS Ritesh Kumar | पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात, मुंबई पेक्षा जास्त पुण्यात प्रतिबंधात्मक कारवाई – पोलीस आयुक्त रितेश कुमार (Video)